जाणोंनि नेणते नेणत्या मागते – संत निवृत्तीनाथ अभंग
जाणोंनि नेणते नेणत्या मागते ।
आपण पुरते नित्यपूर्ण ॥१॥
तें स्वरूप कृष्ण गौळियाच्या भाग्यें ।
नंदासि सौभाग्य भागा आलें ॥२॥
जाणते पूर्णता पूर्णतां समता ।
आपण चित्साता गोंपवेष ॥३॥
निवृत्ति परिमाण सर्वपूर्णघन ।
दिननिशी घन कृष्ण भाग्ययोगें ॥४॥
जाणोंनि नेणते नेणत्या मागते – संत निवृत्तीनाथ अभंग