हें व्यापूनि निराळा – संत निवृत्तीनाथ अभंग
हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा ।
नंदाघरीं गोपाळा हरि माझा ॥१॥
न साहे सगुण अवघाचि निर्गुण ।
तो कृष्ण आपण गोपाळवेषें ॥२॥
गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी ।
वेणु नाना परि वातु असे ॥३॥
निवृत्ति गयनी कृपा जपतो अमुप जाण ।
सांगीतली खूण गोरक्षानें ॥४॥
हें व्यापूनि निराळा – संत निवृत्तीनाथ अभंग