गोत वित्त चित्त गोतासी अचुक – संत निवृत्तीनाथ अभंग
गोत वित्त चित्त गोतासी अचुक ।
चाळक पंचक तत्त्वसार ॥१॥
तें जप सादृश्य कृष्णनाम सोपें ।
नंदायशोदाखोपें बाळलीला ॥२॥
निरसूनि गुण उगविली खूण ।
गोकुळी श्रीकृष्ण खेळे कैसा ॥३॥
निवृत्तिचें सार कृष्णनामें पार ।
सर्व हा आचार हरीहरी ॥४॥
गोत वित्त चित्त गोतासी अचुक – संत निवृत्तीनाथ अभंग