गोपाळ संवगडे आले वाडेकोडें – संत निवृत्तीनाथ अभंग
गोपाळ संवगडे आले वाडेकोडें ।
असंख्य बागडे हरिरूपीं ॥ १ ॥
बिंबली पंढरी हरीरूपीं सार ।
अवघाचि श्रृंगार विठ्ठलराजु ॥ २ ॥
कालया कौशल्या नामदेव जाणे ।
तेथीलीहे खुणे निवृत्तिराजु ॥ ३ ॥
ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा ।
नहरहि वेगा झेलिताती ॥ ४ ॥
वैकुंठ सांवळे मजि भक्त मेळे ।
काला एक्या काळें करिताती ॥ ५ ॥
निवृत्ति संपूर्णता घेउनि उद्गारु ।
सेविता उदार हरिराणा ॥ ६ ॥
गोपाळ संवगडे आले वाडेकोडें – संत निवृत्तीनाथ अभंग