गनीं वोळलें येतें तें देखिलें – संत निवृत्तीनाथ अभंग


गनीं वोळलें येतें तें देखिलें ।
दर्पणीं पाहिलें बिंबलेपण ॥ १ ॥
तें रूप सुरूप सुरूपाचा विलास ।
नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥ २ ॥
सांडुनी धिटिंव जालासे राजीव ।
सर्वत्र अवेव ब्रह्मपणें ॥ ३ ॥
निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला ।
दर्पण विराला आत्मबोधीं ॥ ४ ॥


गनीं वोळलें येतें तें देखिलें – संत निवृत्तीनाथ अभंग