गगनींचा गगनीं तेज पूर्ण – संत निवृत्तीनाथ अभंग


गगनींचा गगनीं तेज पूर्ण धरणी ।
आपणची तरणी जगा यया ॥१॥
ब्रह्म माजीवडे गोपाळ संगती ।
वेद वाखणिती ज्याची महिमा ॥२॥
लोपती त्या तारा हारपे दिनमणि ।
तो खेळे चक्रपाणी गोपाळामाजी ॥३॥
निवृत्ति निधान श्रीरंग खेळतु ।
गोपिकासी मातु हळुहळु ॥४॥


गगनींचा गगनीं तेज पूर्ण – संत निवृत्तीनाथ अभंग