गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड – संत निवृत्तीनाथ अभंग


गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं ।
चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥ १ ॥
देखिलागे माये सुंदर जगजेठी ।
नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
आकाश सौरस तत्त्व समरस ।
तो हा ह्रषिकेश गोपीसंगें ॥ ३ ॥
निवृत्ति साधन निरालंबीं ध्यान ।
तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझें ॥ ४ ॥


गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड – संत निवृत्तीनाथ अभंग