द्वैताचीये प्रभे नसोन उरला – संत निवृत्तीनाथ अभंग
द्वैताचीये प्रभे नसोन उरला ।
निराकार संचला एकरूपें ॥ १ ॥
तें हें सांवळें स्वरूप डोळस ।
बाळरूप मीस घेतलेंसे ॥ २ ॥
तिहीं लोकीं दुर्लभ न कळे जीवशिवीं ।
तो आपणचि लाघवी मावरूपें ॥ ३ ॥
निवृत्तीचें सार जीवशिवबिढार।
रूनें निर्धार सांगितला ॥ ४ ॥
द्वैताचीये प्रभे नसोन उरला – संत निवृत्तीनाथ अभंग