दुजेपणा मिठी आपणचि – संत निवृत्तीनाथ अभंग
दुजेपणा मिठी आपणचि उठी ।
कल्पना हे सृष्टि गाळूं पाहे ॥ १ ॥
तें कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढें ।
दूध लाडेंकोडें मागतसे ॥ २ ॥
सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु ।
ब्रह्मींच उपवडू उघडा दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति उघड ब्रह्मांडामाजि लोळे ।
नंदाघरीं खेळे गोपवेष ॥ ४ ॥
दुजेपणा मिठी आपणचि – संत निवृत्तीनाथ अभंग