ध्यानाची धारणा उन्मनीचे – संत निवृत्तीनाथ अभंग


ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज ।
लक्षितां सहज नये हातां ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम सखे नंदघरी ।
गौळियां माझारी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
न दिसे पाहतां शेषादिका गति ।
यशोदे श्रीपति बाळ झाला ॥ ३ ॥
गुंतलें मायाजाळीं अनंत रचनें ।
तो चतुरानना खुणें न संपडे ॥ ४ ॥
नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी ।
शेखीं तो अनुभवीं भुलविला ॥ ५ ॥
निवृत्ति रचना कृष्णनामें सार ।
नंदाचें बिढार ब्रह्म झालें ॥ ६ ॥


ध्यानाची धारणा उन्मनीचे – संत निवृत्तीनाथ अभंग