धीराचे पैं धीर उदार ते पर – संत निवृत्तीनाथ अभंग
धीराचे पैं धीर उदार ते पर ।
चोखाळ अमर अभेदपणें ॥ १ ॥
तें हें चतुर्भुज कृष्णरूपें खेळे ।
माजि त्या गोपाळें छंदलग ॥ २ ॥
किडाळ परतें चोखाळ अरुतें ।
मी माझें हे कर्ते तेथें नाहीं ॥ ३ ॥
निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ ।
सर्वत्र गोपाळ सखा आम्हां ॥ ४ ॥
धीराचे पैं धीर उदार ते पर – संत निवृत्तीनाथ अभंग