देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं – संत निवृत्तीनाथ अभंग


देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं ।
तो हा चक्रपाणी नंदाघरें ॥१॥
नंदानंदान हरि गौळण गोरस ।
गोकुळीं हृषीकेश खेळतसे ॥२॥
हरि हा सकुमार भौमासुर पैजा ।
वोळलासे द्विजा धर्मा घरीं ॥३॥
निवृत्ति रोकडे नाम फाडोवाडें ।
हरिरूप चहूंकडे दिसे आम्हां ॥४॥


देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं – संत निवृत्तीनाथ अभंग