चिंतितां साधक मनासि ना – संत निवृत्तीनाथ अभंग
चिंतितां साधक मनासि ना कळे ।
तो गोपिकासी आकळे करितां ध्यान ॥ १ ॥
देखिलागे माये सगुणागुणनिधि ।
यशोदा गोविंदीं प्रेम पान्हा ॥ २ ॥
न माये सर्वाघटी आपणचि सृष्टी ।
तो यमुनेच्या तटीं गायी चारी ॥ ३ ॥
निवृत्ति साधन कृष्णाचे रूपडें ।
ब्रह्मांडा एवढें तदाकार ॥ ४ ॥
चिंतितां साधक मनासि ना – संत निवृत्तीनाथ अभंग