बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व – संत निवृत्तीनाथ अभंग
बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व ।
तेथे देहभाव अर्पियेला ॥ १ ॥
नाही काळ वेळ नाहीं तो नियम ।
सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥ २ ॥
हरिरूप सर्व गयनि प्रसादे ।
सर्व हा गोविन्द आम्हां दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति सफळ गयनि वोळला ।
सर्वकाळ जाहला हरिरूप ॥ ४ ॥
बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व – संत निवृत्तीनाथ अभंग