ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी – संत निवृत्तीनाथ अभंग
ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी ।
तें नंदयशोदेघरीं खेळतसे ॥ १ ॥
त्रैलोक्यदुर्लभ ब्रह्मांदिका सुलभ ।
रुक्मिणीवल्लभ कृष्ण सांवळा॥ २ ॥
हिरण्याक्ष वधूनि दाढेवरी मेदिनी ।
तो हा चक्रपाणी यशोदेचा ॥ ३ ॥
रामावतारु गाढा दशशिरा रगडा ।
रिठासुर दाढा तेणेंपाडें ॥ ४ ॥
चतुर्भुज श्रीपति सुकुमार साजती ।
शंख चक्रांकिती हरि माझा ॥ ५ ॥
निवृत्ति ध्यानशूर सर्वरूपें श्रीधर ।
जिंकिला भौमासुर रणयुद्धीं ॥ ६ ॥
ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी – संत निवृत्तीनाथ अभंग