ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा – संत निवृत्तीनाथ अभंग
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा ।
जो गौळियांच्या काजा तिष्ठतुसे ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वाभावी ।
वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती ।
तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ ।
पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा – संत निवृत्तीनाथ अभंग