बिंबीं बिंबीं येक बिंबलें – संत निवृत्तीनाथ अभंग


बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक ।
आपण तिन्हीलोक एक्यारूपें ॥१॥
तो कृष्णरूप ठसा गोपाळां लाधला ।
सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥२॥
निळिमा अंबरीं निजवर्ण तेज ।
गोपाळ सहज बिंबाकार ॥३॥
निवृत्ति परिपाठा नीळवर्ण खरा ।
नंदाचिया घरा कृष्ण आले ॥४॥


बिंबीं बिंबीं येक बिंबलें – संत निवृत्तीनाथ अभंग