भवजळ काया पंचतत्त्वमाया – संत निवृत्तीनाथ अभंग


भवजळ काया पंचतत्त्वमाया ।
भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥
तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं ।
ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥
माया मोहजाळ ममता निखळ ।
सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥
निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ ।
तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥


भवजळ काया पंचतत्त्वमाया – संत निवृत्तीनाथ अभंग