भरतें ना रितें आपण वसतें – संत निवृत्तीनाथ अभंग


भरतें ना रितें आपण वसतें ।
सकळ जग होते तयामाजी ॥ १ ॥
तें रूप पैं ब्रह्म चोखाळ सर्वदा ।
नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ २ ॥
आशापाश नाहीं घरीं पूर्णापूर्ण ।
सकळ जग होणे एक्यारूपें ॥ ३ ॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक ।
जेथें ब्रह्मादिक ध्याती सदा ॥ ४ ॥


भरतें ना रितें आपण वसतें – संत निवृत्तीनाथ अभंग