भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें – संत निवृत्तीनाथ अभंग
भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें ।
तें पुंडलिका संगें भीमातटीं ॥ १ ॥
ध्यान मनन एक करितां सम्यक ।
होय एकाएक एक तत्त्व ॥ २ ॥
उदोअस्तुमेळें ब्रह्म न मैळें ।
भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत विठ्ठल सतत ।
नघे दुजी मात हरिविण ॥ ४ ॥
भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें – संत निवृत्तीनाथ अभंग