अवीट अमोला घेता पैं निमोला – संत निवृत्तीनाथ अभंग


अवीट अमोला घेता पैं निमोला ।
तो प्रत्यक्ष देखिला भीमातटीं ॥ १ ॥
अव्यक्त साकार अकारिला अंकूर ।
क्षरला चराचर भक्तिकाजें ॥ २ ॥
अनुमान विटे सर्वाघटींमाजिटें ।
तें परब्रह्म ईटें भक्तिसाह्य ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट पिकलिसे पेठ ।
पुंडलिकें प्रगट केलें असे ॥ ४ ॥


अवीट अमोला घेता पैं निमोला – संत निवृत्तीनाथ अभंग