अनंतरूप देव अनंत आपण – संत निवृत्तीनाथ अभंग


अनंतरूप देव अनंत आपण ।
अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥ १ ॥
तो हा हरिमाये गोकुळीं अवतार ।
गोपीसंगें श्रीधर खेळतुसे ॥ २ ॥
शास्त्रांसि नाकळे श्रुति ही बरळे ।
तें गोपवेषें खेळे गोपाळांमाजी ॥ ३ ॥
निवृत्तिचें सार गयनीविचार ।
ब्रह्मचराचरमाजि वसे ॥ ४ ॥


अनंतरूप देव अनंत आपण – संत निवृत्तीनाथ अभंग