अनंत रचना हारपती ब्रह्मांडे – संत निवृत्तीनाथ अभंग

अनंत रचना हारपती ब्रह्मांडे ।
हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥
तें रूप राजस वसुदेव भोगी ।
देवक्रियेलागी वोळलेंसे ॥२॥
विचित्र रचना ब्रह्मांड कुसरी ।
निरालंब हरि गोकुळीं वसे ॥३॥
निवृत्ति संपदा गाताती गोविंदा ।
भोगिती मुकुंदा निजबोधे ॥४॥

अनंत रचना हारपती ब्रह्मांडे – संत निवृत्तीनाथ अभंग