आम्हां जप नाम गुरुखूण – संत निवृत्तीनाथ अभंग


आम्हां जप नाम गुरुखूण सम ।
जन वन धाम गुरुचेचि ॥ १ ॥
नेघों कल्पना न चढों वासना ।
एका पूर्णघना शरण जाऊं ॥ २ ॥
तप हें अमूप नलगे संकल्प ।
साधितां संकल्प जवळी असे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन ।
हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥ ४ ॥


आम्हां जप नाम गुरुखूण – संत निवृत्तीनाथ अभंग