अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता – संत निवृत्तीनाथ अभंग
अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता ।
आपण तत्वता स्वयें असे ॥ १ ॥
तें रूप चोखाळ कृष्णनामें बिंबे ।
यशोदा सुलभें गीतीं गाय ॥ २ ॥
व्योमाकार ठसा नभीं दशदिशा ।
त्यामाजि आकाशा अवकाश होय ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म ।
उपदेश सुगम कृष्णनाम ॥ ४ ॥
अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता – संत निवृत्तीनाथ अभंग