अद्वैत अमरकंदु हा घडला – संत निवृत्तीनाथ अभंग


अद्वैत अमरकंदु हा घडला ।
ब्रह्मांडी संचला ब्रह्मासाचें ॥१॥
तें रूप कारण कृष्ण तेजाकार ।
सर्व हा आकार त्याचा असे ॥२॥
विराट विनटु विराट दिसतु ।
आपणचि होतु ब्रह्मसुख ॥३॥
निवृत्ति कोवळें आपण सोंविळें ।
त्यामाजी वोविलें मन माझें ॥४॥


अद्वैत अमरकंदु हा घडला – संत निवृत्तीनाथ अभंग