आपुलेनि हातें कवळु समर्पी – संत निवृत्तीनाथ अभंग


आपुलेनि हातें कवळु समर्पी ।
ब्रह्मार्पण मुखीं ब्रह्मपणे ॥ १ ॥
सोपान सावंता निवृत्ति निधान ।
यासि जनार्दन कवळ देतु ॥ २ ॥
ब्रह्मपद हरि बाह्य अभ्यंतरीं ।
सर्वत्र श्रीहरि दिसे तया ॥ ३ ॥
देऊनि हस्तक पुशी पीतांबरें ।
पुसतसे आदरें काय आवडे ॥ ४ ॥
राहीरखुमाबाई कासवीतुसार ।
अमृत सार सर्वाघटी ॥ ५ ॥
निवृत्ति खेचर सोपान सांवता ।
हरि कवळु देतां तृप्त जाले ॥ ६ ॥


आपुलेनि हातें कवळु समर्पी – संत निवृत्तीनाथ अभंग