आनंद सर्वांचा काला अरुवार – संत निवृत्तीनाथ अभंग


आनंद सर्वांचा काला अरुवार ।
नामया साचार फुंदतसे ॥ १ ॥
राहिरखुमाई सत्यभामा माता ।
आलिया त्वरिता काल्यामाजी ॥ २ ॥
उचलिला नामा प्रेमाचें फुंदन ।
नुघडी तो नयन कांही केल्या ॥ ३ ॥
बुझावित राही रखुमादेवी बाही ।
पीतांबर साई करू हरी ॥ ४ ॥
ज्ञानासी कवळु सोपानासी वरु ।
खेचरा अरुवारु कवळु देत ॥ ५ ॥
निवृत्ति पूर्णिमा भक्तीचा महिमा ।
नामयासि सीमा भीमातीरीं ॥ ६ ॥


आनंद सर्वांचा काला अरुवार – संत निवृत्तीनाथ अभंग