आदीची अनादि मूळ पैं सर्वथा – संत निवृत्तीनाथ अभंग
आदीची अनादि मूळ पैं सर्वथा ।
परादि या कथा हारपती ॥ १ ॥
तें अव्यक्त रूप देवकीचें बाळ ।
वसुदेवकुळ कृष्णठसा ॥ २ ॥
मुरालीं ब्रह्मांडें अमितें पैं अंडें ।
ढिसाळ प्रचंडें जया माजी ॥ ३ ॥
निवृत्तीचें धन माजी तो श्रीकृष्ण ।
सांगितला प्रश्न गयनीराजें ॥ ४ ॥
आदीची अनादि मूळ पैं सर्वथा – संत निवृत्तीनाथ अभंग