पहा दिसतो पदार्थ ।
अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥
माया बहुरूपी नटली ।
नवखंडी प्रगटली ॥ २ ॥
प्रपंच हें माया जाळ ।
घातलें भ्रांतीचें पडळ ॥ ३ ॥
उमज पडेना हो कांहीं ।
मस्तक सद्गुरूचे पायीं ॥ ४ ॥
सद्गुरुनाम हें अमृत ।
नरहरी जपे ह्रदयांत ॥ ५ ॥
पहा दिसतो पदार्थ ।
अवघा नाशिवंत व्यर्थ ॥ १ ॥
माया बहुरूपी नटली ।
नवखंडी प्रगटली ॥ २ ॥
प्रपंच हें माया जाळ ।
घातलें भ्रांतीचें पडळ ॥ ३ ॥
उमज पडेना हो कांहीं ।
मस्तक सद्गुरूचे पायीं ॥ ४ ॥
सद्गुरुनाम हें अमृत ।
नरहरी जपे ह्रदयांत ॥ ५ ॥