नाशिवंत देह मनाचा निश्चय ।
सद्गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥
कलीमध्यें फार सद्गुरू हा थोर ।
नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥
भजनाचा गजर नामाचा उच्चार ।
ह्रदयीं निरंतर नरहरीचें ॥ ३ ॥
नाशिवंत देह मनाचा निश्चय ।
सद्गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥
कलीमध्यें फार सद्गुरू हा थोर ।
नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥
भजनाचा गजर नामाचा उच्चार ।
ह्रदयीं निरंतर नरहरीचें ॥ ३ ॥