पंढरी नगरी दैवत श्रीहरी ।
जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥
आषाढी कार्तिकी महापर्वें थोर ।
भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥
साधुसंत थोर पताकांचा भार ।
मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥
आनंदाचा काला गोपाळकाला केला ।
ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥
पंढरी नगरी दैवत श्रीहरी ।
जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥
आषाढी कार्तिकी महापर्वें थोर ।
भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥
साधुसंत थोर पताकांचा भार ।
मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥
आनंदाचा काला गोपाळकाला केला ।
ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥