व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें – संत मुक्ताबाई अभंग


२१
व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें।
एकतत्त्व दीपाचें हृदयीं नांदे ॥१॥
चांगवा फावलें फावोनी घेतलें।
निवृत्तीनें दिवले आमुच्या करीं ॥२॥
आदि मध्य यासी सर्वत्र निवासी ।
एक रूपें निशी दवडितु ॥३॥
मुक्ताई पूर्णता एकरूपें चित्ता ।
आदि अंतु कथा सांडियेली ॥४॥