विश्रांति मनाची निजशांति साची – संत मुक्ताबाई अभंग


२७
विश्रांति मनाची निजशांति साची ।
मग त्या यमाची भेटी नाहीं ॥१॥
अधिकारी मन मग सारी स्नान ।
रोकडेंचि साधन आलें हाता ॥२॥
साधिलें साधन नित्य अनुष्ठान ।
चित्तीं नारायणमंत्र जपे ॥३॥
मुक्ताई प्रवीण नारायण धन।
नित्य मंत्र स्नान करीं वेगीं ॥४॥