वरी भगवा झाला नामे – संत मुक्ताबाई अभंग



वरी झाला भगवा जाण ।
अंतरी वश्य नाही मन ॥
त्याला म्हणू नये साधू जगी ।
विटंबना बाधू आप आपणा शोधूनि घ्यावे ।
जगी जैसे विरक्त व्हावे ॥
विष ग्रासोग्रासी घ्यावे ।
विवेक नांदे त्याच्या सवे ॥
आशा दंभ दूर करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥