उर्णाचिया गळां बांधली दोरी – संत मुक्ताबाई अभंग


२४
उर्णाचिया गळां बांधली दोरी।
पाहों जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥१॥
तैसें झालें बाई जंव एकतत्त्व नाहीं ।
दुजी जंव साई तंव है अंध॥२॥
ऐसी मी हो अंध जात होतें वायां ।
प्रकृति सावया पावली तेथें ॥३॥
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज ।
हरिप्रेमें उमज एकतत्त्वें ॥४॥