शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं – संत मुक्ताबाई अभंग
२
शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं ।
पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें ॥१॥
कैसागे माये हा तारकु दिवटा।
पंढरी वैकुंठा प्रगटला ॥२॥
न कळे याची गती आदि मध्य अंतीं ।
जेथें श्रुति नेति नेति प्रगटल्या ॥३॥
मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम ।
शून्याहि शून्य समशेजवाजे ॥४॥