सर्वी सर्व सुख अहं तेचि दुःख – संत मुक्ताबाई अभंग
१८
सर्व सर्व सुख अहं तेचि दुःख ।
मोहममता विष त्यजीयेलें ॥१॥
साधक बाधक करूनि विवेक ।
मति मार्ग तर्क शोधियेला ॥२॥
सर्वतीर्थ हरि दुमाळु धनुवो।
चोळला कणवा चातकाचा ॥३॥
सूक्ष्ममार्ग त्याचा भक्त देहीं मायेचा।
आकळावयाचा सत्त्व घरीं ॥४॥
वेद जंव वाणी श्रुति तुपें ।
काहाणी ऐको जाय ।
कर्णी तंव परता जाय ॥५॥
मुक्ताई सोहंभावें भरलें दिसे देवें।
मूर्तामूर्त सोहंभावे हरि घोटी ॥६॥