परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा – संत मुक्ताबाई अभंग
१७
परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा ।
तथा नाहीं कदा गर्भवास ॥१॥
उपजोनी जनीं धन्य ते योनी ।
चित्त नारायण मुक्तलग ॥२॥
अव्यक्तीं पैं व्यक्ति चित्तासि अनुभव ।
सर्व सर्व देव भरला दिसे ॥३॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान ।
चित्त नारायण झालें त्याचें ॥४॥
आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला ।
परतोनि अबोला प्रपंचैसी ॥५॥
मुक्ताईचे निरंतर मुक्त ।
हरि सिंचित आम्हां घरीं ॥६॥