निर्गुणाची सैज सगुणाची बाज – संत मुक्ताबाई अभंग
३६
निर्गुणाची सैज सगुणाची बाज ।
तेथे केशीराज पहुडले ॥१॥
कैसे याचें करणें दिवसां चांदि ।
सावळें उठणें एका तत्त्वें ॥२॥
नाहीं या ममता अवघीच समता ।
आदि अंतु बिंबतां नलगे वेळू॥३॥
मुक्ताई सधन सर्वत्र नारायण ।
जीव शिव संपूर्ण एकतत्त्वें ॥४॥