नामबळें देहीं असोनि मुक्त – संत मुक्ताबाई अभंग


३०
नामबळें देहीं असोनि मुक्त ।
शांति क्षमा चित्त हरिभजन ॥१॥
दया धरा चित्तीं सर्वभूतीं करुणा ।
निरंतर वासना हरिरूपीं ॥२॥
माधव मुकुंद हरिनाम ।
चित्तीं सर्वमुक्ति नामपायें ॥३॥
मुक्ताईये धन हरिनामें उच्चारु ।
अवघाचि संसारु मुक्त केला ॥४॥