नाम मंत्रें हरि निज दासां पावे – संत मुक्ताबाई अभंग


११
नाम मंत्र हरि निज दासां पावे।
ऐकोनी घ्यावें झडकरी ॥१॥
सुदर्शन करीं पावे लवकरी पांडवां ।
साहाकारी श्रीकृष्ण रथा ॥२॥
निजानंद दावी उघडें में बैकुंठ ।
नामेचि प्रगट आम्हालागीं ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार ।
हरि पारावार केला आम्हीं ॥४॥