नादाबिंदा भेटी जे वेळीं पैं जाली – संत मुक्ताबाई अभंग
६
नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली ।
ऐशी ऐकी बोली बोलतो जीव ॥१॥
उगेची मोहन धरूनी प्रपंची ।
त्याशी पै यमाची नगरी आहे ॥२॥
जिवजंतू जडत्वासी उपदेशी ।
त्यासी गर्भवासी घाली देव ॥३॥
मुक्ताई श्रीहरी उपदेशी निवृत्ती ।
संसार पुढती नाही आम्हा ॥४॥