मुंगी उडाली आकाशीं – संत मुक्ताबाई अभंग


४६
मुंगी उडाली आकाशीं |
तिणें गिळिलें सूर्याशीं ॥१॥
थोर नवलाव जाहला |
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥
विंचु पाताळाशी जाय |
शेष माथां वंदी पाय ॥३॥
माशी व्याली घार झाली |
देखोन मुक्ताई हांसली ॥४॥