मुक्तपणें सांग देवो होय देवांग – संत मुक्ताबाई अभंग
२८
मुक्तपणे सांग देवो होय ।
देवांग मीपणे उद्वेग नेघे स्था ॥१॥
वाउगे मीपण आथिलें प्रवीण ।
एक नारायणतत्त्व खरें ॥२॥
मुक्ता मुक्ती दोन्ही करी कारे शिराणी।
द्वैताची काहाणी नाहीं तुज ॥३॥
मुक्ताई अद्वैत द्वैतीं द्वैतातीत ।
अवघाचि अनंत दिसे देहीं ॥४॥