मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णीं – संत मुक्ताबाई अभंग


१४
मुक्तामुक्त दोन्ही आईक तो ।
कर्णी हरिनाम वर्णी सदा काळ ॥१॥
नाहीं काळ तेथें आम्हां वेळ कैची।
हरिनामछंदाची गोडी थोरी ॥२॥
नाना विघ्नबाधा नाईकों आम्हीं ।
कदां निरंतर धंदा रामकृष्ण ॥३॥
मुक्तपणे मुक्त मुक्ताई ।
हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥४॥