करणें जंव कांही करूं जाये शेवट – संत मुक्ताबाई अभंग
३१
करणें जंव कांहीं करूं जाये शेवट ।
तव पडे आडवाटे द्वैतभावें ॥१॥
राहिलें करणें नचलें में कर्म ।
हरिविण देहधर्म चुकताहे ॥२॥
मोक्षालागीं उपाय करितोसि नाना ।
तंव साधनीं परता पडो पाहे ॥३॥
मुक्ताई करि हरि श्रवण पाठ।
तेणें मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥४॥