जेथें जे पाहे तेथें तें आहे – संत मुक्ताबाई अभंग
३८
जेथे जें पाहे तेथें तें आहे ।
उभारोनि बाहे वेद सांगे ॥१॥
सोमकांतीं झरा कोठील दुसरा ।
तत्त्वीं तत्त्वें धरा निजदृष्टीं ॥२॥
हेतु मातु आम्हा अवघाचि परमात्मा ।
सोहंभावें सोहं आत्मा सर्वी असे ॥३॥
मुक्तलग खुण मुक्ताई प्रमाण ।
देहीं देहो सौजन्य निजतेजें ॥४॥