गिरीगव्हारे कशासाठीं – संत मुक्ताबाई अभंग
१०
गिरीगव्हर कशासाठी ।
रागे पुरविली पाठी ॥
ऐसा नसावा संन्यासी ।
परमार्थाचा होय द्वेषी ॥
घर बांधणे डोंगरी विषय ।
हिंडे दारोदारी काय केला ।
योगधर्म नाही अंतरी निष्काम ।
गंगाजळ हृदय करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥