देऊळींचा देवो घरभरी भावो – संत मुक्ताबाई अभंग


२६
देवींचा देवो घरभरी भायो |
कजसेवीण वाचो जातु असे ॥१॥
जाताती वाउगे नटनाट्यसोंगें ।
चित्तअनुरागं भजतीना ॥२॥
असोनि न दिसे उगयाचि पिसें ।
घेती वायां वसे सज्जनेवीण ॥३॥
रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं ।
साकारलें आहे न कळे तया ॥४॥
भ्रांतीचेनि भूली वायाचि घरकुली।
माया आड ठेली अरे रथा॥५॥
मुक्ताई परेसी दुमतें चहंगी ।
सत्राची सर्वरस एका देवें ॥६॥